तुम्हालाही तलाठी होयचंय ? मग ‘ही’ महत्वाची पुस्तकें येतील कामी !

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – संपूर्ण देशभरात सरकारी नोकरीसाठी भरपुर तरुण, तरुणीं जीवतोड मेहनत करत असतात. महाराष्ट्रामधील तरुण-तरुणी पोलीस भरती, तलाठी भरती अशा अनेक सरकारी पदांवर नोकरी मिळवण्यासाठी अभ्यास करत असतात. यामध्ये काही तरुणांना यश मिळतं तर काही जण अपयशी होतात. यामध्ये तलाठी पद मिळवण्यासाठी हजारो तरुण परीक्षा देतात. मात्र ही परीक्षा पास करणंही तितकंच कठीण आहे. जर तलाठी या पदासाठी तयारी करत असाल तर आज आम्ही तुम्हाला तलाठी पदाच्या परीक्षेसाठी उपयोगी असणाऱ्या महत्वाच्या पुस्तकांची माहिती देणार आहोत. हे पुस्तके अभ्यास करून तुम्ही तलाठी होण्याचे स्वप्न पूर्ण करू शखता.

तलाठी हा ग्रामस्तरावरील महसूल खात्याचा वर्ग – 3 चा कर्मचारी असतो. म्हणजेच तलाठी हे गट ‘अ’ प्रकारचे पद आहे. महसूल खात्याचे गावपातळीवरील कार्यक्रम तलाठी सांभाळतो.

तलाठी पदाच्या तयारीसाठी लागणारी महत्वाची पुस्तके –
1.Essential English for competitive examinations by Dr. Rashmi Singh

भारतातील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाणारे प्रत्येक आवश्यक विषय आणि MCQ चे प्रकार आणि नमुना या संबंधित माहिती देणारे हे पुस्तक आहे. इंग्रजी विभागात उच्च गुण मिळवण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.

2.Rapid general knowledge 2021 for competitive exams by Disha Publications

या पुस्तकामध्ये संपूर्ण जनरल नॉलेज आणि करंट अफेयर्सबाबत संपूर्ण माहिती दिलेली आहे. तसंच मागील परीक्षेत विचारल्या गेलेल्या आणि जाणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरं या पुस्तकात तुम्हाला मिळू शकतील.

3.Dnyandeep Talathi 2022 Vargikrut Prashnasanch by Jitendra Pundekar

या पुस्तकामध्ये तलाठी परीक्षेत विचारले गेलेली आणि विचारले जाणारे सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरं मिळतील. यामध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रश्नही मिळतील.

4.Talathi Chalis Prashnapatrika (Marathi) by Vinayak Ghayal

तलाठी परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी हे पुस्तक सर्वात महत्त्वाचे आहे. यामध्ये तलाठी परीक्षेतील काही नमुना प्रश्नपत्रिका मिळतील. या नमुना प्रश्नपत्रिकांद्वारे तुम्ही योग्य पद्धतीने परीक्षेची तयारी करू शखता.

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com