मुंबई । महाराष्ट्र करोना विरुद्ध लढा देत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेळोवेळी राज्यातील जनतेशी संवाद साधत आहेत. आजही मुख्यमंत्री ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह वरून जनतेशी संवाद साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तरुण उद्योजकांना हाक दिली आहे. तसेच यावेळी नवीन उद्योजकांना भाडेतत्वावर जमीन देण्याची घोषणाही ठाकरे यांनी केली आहे. नवीन उद्योगांसाठी एकूण ४० हजार एकर जमीन शासनाने राखून ठेवली असल्याची माहिती देखील ठाकरे यांनी दिली आहे.नवीन उद्योजकांना प्रदूषण न करणे हि अट असणार आहे. ठाकरे यांनी लॉकडाऊन-४ जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज प्रथमच जनतेला संबोधित करत असून करोनाची साथ आणि आर्थिक कोंडी अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या महाराष्ट्राला ते कोणती नवी वाट दाखवतात हे पाहावे लागणार आहे.
CM Uddhav Balasaheb Thackeray addressing the State https://t.co/Pz6crN63Ee
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 18, 2020
“येत्या काळात ग्रीन झोन, ऑरेंज झोनमध्ये शिथिलता आणली आहे. येत्या काळात आणखी शिथिलता देणार आहोत असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आजपर्यंत राज्यात ५० हजार उद्योगांना संमती दिली आहे. ५ लाख मजूर यामध्ये काम करत आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं. उद्योगांसाठी काही गोष्टी जाहीर करायच्या आहेत. कारण पॉज बटण दाबलं गेलं आहे. ज्यामुळे जग थांबलं आहे असंही ते म्हणाले आहेत. सरकारला ६ महिने होत आहेत. त्याआधीच या संकटाला सामोरं जावं लागतं आहे. एका हिंमतीने आपण पुढे जातो आहोत. नवीन उद्योग येण्यासाठी वेगळी स्पर्धा आहे. ४० हजार एकरपेक्षा जास्त जमीन नव्या उद्योगधंद्यांसाठी राखीव ठेवली आहे. नवे उद्योजक कदाचित जमीन खरेदी करणार नाहीत मात्र त्यांना भाडे तत्त्वावर जमिनी देऊ” असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com