IIT-JEE (Main) परीक्षेच्या तारीखा ठरल्या; आता ‘या’ महिन्यात होणार परीक्षा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

नवी दिल्ली । कोरोनाच्या प्रादुर्भावामुळ स्थगित करण्यात आलेल्या IIT-JEE Main परीक्षेच्या तारखांची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक केली आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी इंजिनिअरिंगच्या यूजी कोर्सेसच्या प्रवेशांसाठी जेईईची पात्रता परीक्षा देतात. यावर्षीही बारावीची परीक्षा दिलेल्या इंजिनिअरिंगला जाऊ इच्छिणाऱ्या लाखो विद्यार्थांना या परीक्षा कधी होणार याची चिंता वाटतं होती अखेर IIT-JEE Main परीक्षेच्या तारखा ठरल्या असून ही परीक्षा जुलै महिन्यात होणार आहे.

येत्या जुलै महिन्याच्या १८, २०, २१, २२ आणि २३ तारखांना IIT-JEE Main परीक्षा घेण्यात येणार आहे. तर IIT-JEE Advance परिषेकच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितलं आहे. याचबरोबर CBSE बोर्डाच्या दहावीच्या आणि बारावीच्या रखडलेल्या परीक्षाबाबत लवकर निर्णय घेण्यात असल्याचेही रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितलं.

 

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com