मुंबई | दहावीचा उर्वरित एक पेपर लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अशी माहिती दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणुन सदर निर्णय घेण्यात आला असल्याचे समजत आहे.
राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ६३ वर पोहोचला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी ३१ मार्च पर्यंत सर्व खाजगी कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले. दहावीचे उर्वरीत दोन पेपर मात्र नियोजित वेळेत होतील असे सांगितले होते. मात्र आता आज शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचे उर्वरित एक पेपर पुढे ढकल्याचे जाहीर केले आहे.
दरम्यान ३१ मार्चपर्यंत सर्व शिक्षकांना वर्क फ्रोम होमचे आदेश आहेत. आता दहावीचा उर्वरीत भुगोलचा पेपरही पुढे ढकलण्यात आला आहे. ३१ मार्च नंतर पेपरची तारिख जाहीर करण्यात येईल अशी माहिती गायकवाड यांनी दिली आहे.
नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता ? घाबरू नका ? नोकरी विषयक अधिक माहितीसाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”
visit : www.careernama.com