कोरोना इफेक्ट : वायुसैनिकांची ऑनलाइन परीक्षा लांबणीवर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आढळल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर  केंद्रीय वायूसैनिक भरती मंडळाने वायूसैनिकांची ऑनलाइन परीक्षा पुढे ढकलली. हा निर्णय सेंट्रल एअरमेन सिलेक्शन बोर्डाने घेतला आहे.

वायूसैनिकांची ऑनलाइन परीक्षा देशभरातील 86 शहरात 19 ते 23 मार्च दरम्यान होणार होती. ही एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात होऊ शकेल, असे हवाईदल जनसंपर्क विभागाने कळवले आहे. या परीक्षासंदर्भात काही शंका असतील तर  www.airmenselection.cdac.in या संकेतस्थळावर संपर्क साधता येईल.

“राज्यसरकारने कोरोना विषाणूच्या संसर्गागामुळे गर्दीची ठिकाणे टाळण्यासाठी अनेक ठिकाणी कलम 144 लागू केले आहे. त्यामुळे वायूसैनिकांची ऑनलाइन परीक्षा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात जाऊ शकते.” असे सेंट्रल एअरमेन सिलेक्शन बोर्डाने परिपत्रकात म्हटले आहे.

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची शंका आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक अधिक माहितीसाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”