कोरोनाची धास्ती- 31 मार्चपर्यंत राज्यातील सगळ्या शाळांना सुट्टी जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । कोरोना व्हायरसच्या भीतीने ३१ मार्च पर्यंत राज्यातील सगळ्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने परिपत्रक काढलं आहे. सोमवारपासून पुढची सूचना मिळेपर्यंत 31 मार्चपर्यंत शाळा बंद राहतील, असं या परिपत्रकात सांगण्यात आलं आहे. शासनाच्या, महापालिकेच्या आणि खासगी शाळाही बंद ठेवण्यात येणार आहेत.

राज्यातील कोरोनाव्हायरस रुग्णांची संख्या आता 20 वर पोहोचली आहे. नागपुरात कोरोनाव्हायरसचा आणखी एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे नागपुरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 4 झाली आहे, नागपुरात धोका वाढला आहे. तर दुसरीकडे पुण्याहून दिलासादायक बातमी आहे. पुण्यातील दहाही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.

या अगोदर पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शाळा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जिमखाना, चित्रपटगृह बंद ठेवण्यात येणार आहेत. तर गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. या कायद्याचा भंग केल्यास कारवाई होऊ शकते.

अधिक माहितीसाठी –  तसेच नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.