करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ८० वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने १२ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येणार असून राज्यातील किमान ८० हजार सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना त्यानिमित्त खासगी, निमशासकीय कंपन्यांमध्ये नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेसने केला असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते आणि कौशल्य विकास व उद्योजक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करताना, बेरोजगारांच्या हाताला काम देता येईल का, याचा विचार करण्यात आला. किमान काही बेरोजगारांना त्यानिमित्त रोजगार मिळवून देण्याची योजना राबविण्याचे ठरविण्यात आले असून त्यासाठी १२ डिसेंबर रोजी ऑनलाइन महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे. ‘महास्वयंम’ पोर्टलवर सोमवारपासून नोंदणी सुरू करण्यात आली असून १२ डिसेंबपर्यंत ही नोंदणी सुरू राहणार आहे. या ठिकाणी जे लोक नोंदणी करतील, त्यांना रोजगाराची संधी उपब्ध करून दिली जाईल, असे मलिक यांनी सांगितले.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com