करिअरनामा ऑनलाईन । देशभरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची (7th Pay Commission) बातमी आहे. कारण केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोदी सरकार लवकरच एक मोठी घोषणा करणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार सरकार लवकरच केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या DAमध्ये वाढ करणार आहे. यानंतर पगारात बंपर वाढ होणार आहे. महागाई भत्ता (DA) मध्ये 4 टक्के वाढीसह, सरकार फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याची देखील घोषणा करू शकते.
DA किती वाढणार? (7th Pay Commission)
– होळीपूर्वी मोदी सरकार केंद्रीय कर्मचार्यांचा डीए 4 टक्के वाढवण्याची घोषणा करण्याची शक्यता मानली जात आहे. यानंतर, डीए 42 टक्क्यांपर्यंत वाढेल, ज्यामुळे पगारात रेकॉर्डब्रेक वाढ होण्याची शक्यता आहे.
– सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38 टक्के डीएचा लाभ मिळत आहे. 7व्या वेतन आयोगानुसार सरकार वर्षातून दोनदा DA वाढवते. सर्व वाढलेले दर जानेवारी आणि जुलैपासून लागू होणार आहेत.
– जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 1,80,00 रुपये असेल, तर 38 टक्के नुसार त्याला 6840 रुपये डीएचा लाभ मिळत आहे. यानंतर, जर ते 42 टक्के झाले, तर तुम्हाला (7th Pay Commission) डीए म्हणून 7,560 रुपयांचा लाभ मिळेल. वर्षानुसार 8,640 रुपये नफा मिळणे निश्चित मानले जाते.
फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ होणार (7th Pay Commission)
मोदी सरकार केंद्रीय कर्मचार्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये लवकरात लवकर जोरदार घोषणा करू शकते, ज्यामुळे पगारात बंपर वाढ निश्चित आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, फिटमेंट फॅक्टर 3.6 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली जाऊ शकते, ज्यावर बर्याच काळापासून चर्चा होत आहे.
अधिकृतपणे, सरकारने अशी कोणतीही मोठी घोषणा केलेली नाही, परंतु प्रसारमाध्यमांच्या बातम्यांनुसार ती लवकरच वाढवली जाईल असा दावा केला जात आहे. यामुळे (7th Pay Commission) दरवर्षी पगारात वाढ होईल. तसे, सध्या कर्मचार्यांचे मूळ वेतन 18,000 रुपये आहे, ते 26,000 रुपये केले जाईल असे मानले जात आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com