7th Pay Commission : मोठी बातमी!! सरकारी कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटीमध्ये होणार ‘इतकी’ वाढ

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर सरकारी नोकरी करत असाल तर (7th Pay Commission) तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सध्या उन्हाळी सुट्ट्या चालू झालेल्या आहेत आणि याच काळामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी भेट मिळालेली आहे. सध्या देशभर लोकसभेच्या निवडणुकीचे वातावरण चालू आहे. देशात सात टप्प्यात मतदानाची प्रक्रिया होणार, असून त्यातील तीन टप्प्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

ग्रॅच्युईटी मर्यादेमध्ये वाढ (7th Pay Commission)
अशातच लोकसभा निवडणुकीचे आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी केंद्रातील सरकारने कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी त्यांचा महागाई भत्ता हा 46 टक्क्यांवरून 50% एवढा केला आहे. जुलै 2023 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46 टक्क्याने महागाई भत्ता दिला होता. परंतु आता त्यांचा हा महागाई भत्ता 50% करण्यात आला आहे. यासोबतच कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे आता महागाई भत्तासोबतच कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युईटी मर्यादेमध्येही वाढ करण्यात आलेली आहे. आता ही ग्रॅच्युईटी मर्यादा किती टक्के वाढवली आहे याबद्दलची माहिती अजून समोर आली नाही.

सरकारी कर्मचाऱ्यांना इतकी मिळणार ग्रॅच्युईटी
मिळालेल्या माहितीनुसार भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या आदेशावरून सरकारी कर्मचाऱ्यांची ही कमाल रक्कम वाढवण्यात आलेली आहे. डीएमध्ये (Dearness Allowance) 50 टक्के वाढ करण्यासोबतच सरकारने ग्रॅच्युईटीची मर्यादा देखील 25 टक्क्यांनी वाढवली आहे. याबाबत मंत्रालयाने माहिती (7th Pay Commission) दिली आहे की, 1 जानेवारी 2024 पासून सेवानिवृत्ती आणि मृत उपदानाची कमाल मर्यादा सध्याच्या 20 लाखांवरून 25 लाख एवढी करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना कमाल 25 लाख रुपये एवढी ग्रॅच्युईटी मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com