करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामायिक प्रवेश (5 Year Law CET Exam Date 2024) परीक्षा कक्षाने 5 वर्षे विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली आहे. यासाठी इच्छुक विद्यार्थी दि. 8 जुलै ते दि. 13 जुलै या कालावधीत प्रवेश अर्जाची नोंदणी करू शकतात. प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक सीईटी सेलच्या (CET Cell) https://cetcell.mahacet.org/ या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी सीईटी सेलच्या माध्यमातून विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कागदपत्र ऑनलाइन अपलोड करावे लागणार असून या कागदपत्रांची तपासणी 8 ते 14 जुलै या कालावधीत (5 Year Law CET Exam Date 2024) केली जाणार आहेत. विद्यार्थ्यांची पहिल्या प्रवेश फेरीसाठी तात्पुरती गुणवत्ता यादी दि. 15 जुलै रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे तर अंतिम गुणवत्ता यादी 19 जुलै रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. NRI व PIO कोट्यातील प्रवेशासाठी विद्यार्थी 8 जुलै ते 25 जुलै या कालावधीत नोंदणी करू शकतात.
प्रवेशा संदर्भात महत्वाच्या तारखा (5 Year Law CET Exam Date 2024) –
पाच वर्ष विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी सीईटी सेलच्या https://cetcell.mahacet.org/ संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले सविस्तर वेळापत्रक पाहावे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com