12th Supplementary Exam : 12 वी पुरवणी परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । इयत्ता 12 वी पुरवणी परीक्षा देणाऱ्या (12th Supplementary Exam) विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी दि. 17 जूनपर्यंत विलंब शुल्काने अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. यापुर्वी देण्यात आलेली मुदत संपली असून विद्यार्थ्यांना आता दि. 17 जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनुउत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुढील महिन्यात पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे.

इथे करा अर्ज (12th Supplementary Exam)
12 वीची पुरवणी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पध्दतीने http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर दि. 17 जूनपर्यंत विलंब शुल्क भरून अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली आहे. या पुरवणी परीक्षेसाठी अनुत्तीर्ण विद्यार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन पुनर्परीक्षा देणारे विद्यार्थी, आयटीआय विषय घेऊन प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक राज्यमंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर परीक्षेचा अर्ज भरायचा आहे. उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे हे शुल्क दि. 20 जूनपर्यंत (12th Supplementary Exam) भरायचे आहे. तर शाळा आणि महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या दि. 24 जूनपर्यंत जमा करायच्या आहेत, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी सांगितले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com