10 th Board Exam 2024 : दहावी बोर्डाची परीक्षा आजपासून; मराठी विषयाने परीक्षेचा ‘श्री गणेशा’

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । संपूर्ण राज्यात आजपासून 10 वी बोर्डाच्या (10 th Board Exam 2024) परीक्षेला सुरुवात झाली आहे. यावर्षी तब्बल 16 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. राज्यभरात सुमारे 5 हजार 86 केंद्रावर परीक्षेचं नियोजन करण्यात आलं आहे. परीक्षेदरम्यान होणारा गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांचीही नेमणूक करण्यात आली आहे. याबाबत माध्यमिक शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेवून परीक्षेसंदर्भातील सर्व नियोजन पूर्ण झाल्याची माहिती दिली. परीक्षेच्या पहिल्या दिवशी मराठी विषयाचा पेपर होणार आहे.

26 मार्च पर्यंत चालणार परीक्षा (10 th Board Exam 2024)
उद्या दहावीचा पहिला पेपर होत आहे. ही परीक्षा दि. 1 ते 26 मार्च दरम्यान होणार आहे. परीक्षेत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. दहावीनंतर (10 th Board Exam 2024) विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या व भावी जीवनाच्या दिशा स्पष्ट होतात त्यामुळे दहावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील एक महत्वपूर्ण टप्पा समजला जातो.

10 मिनिटाचा जादा वेळ मिळणार
यापूर्वी परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी दिली जाणारी 10 अतिरिक्त मिनिटे यंदा बोर्डाकडून दिली जाणार नाहीत. याउलट आता विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शेवटी प्रश्नपत्रिका पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त 10 मिनिटे वेळ मिळणार आहे. गेल्या वर्षी प्रमाणेच मार्च 2024 परीक्षेसाठी पेपरच्या निर्धारित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटं वाढवून देण्यात आली आहेत.

16 लाख विद्यार्थी देणार परीक्षा
यावर्षी १६ लाख विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. परीक्षेदरम्यान गैरप्रकार होण्याची शक्यता असते त्यामुळे राज्यभर भरारी पथके नेमण्यात आली आहेत. परीक्षेदरम्यान अनुचित प्रकार करणाऱ्यावर (10 th Board Exam 2024) कठोर कारवाई केली जाणार आहे. परीक्षा अत्यंत तणावमुक्त व पारदर्शक वातावरणात घेण्यासाठी परीक्षा मंडळाने सर्व उपाययोजना केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नये. परीक्षा काळात मोबाइलवर व्हायरल होणाऱ्या चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आलं आहे.
– नोंदणी केलेले विद्यार्थी संख्या –
– विद्यार्थी संख्या – ८,५९,४७८
– विद्यार्थिनी संख्या – ७,४९,९११
तृतीयपंथी – ५६ (10 th Board Exam 2024)
– एकूण विद्यार्थी संख्या – १६,०९,४४५
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com