दहावी, बारावी परीक्षांच्या तारखांची घोषणा या आठवड्यात होणार जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा (Exam timetable) या आठवड्यात जाहीर करणार असल्याची माहिती बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली.

दहावीची परीक्षा मे महिन्यात तर बारावीची परीक्षा १५ एप्रिलनंतर आयोजन करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. यापूर्वी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल-मे महिन्यात घेण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. बोर्डाच्या अध्यक्ष शकुंतला काळे निवृत्त झाल्याने दिनकर पाटील यांच्यावर राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे. ‘आम्ही परीक्षांच्या तारखा या आठवड्यात जाहीर करू. विद्यार्थी, शिक्षक, पालकांना परीक्षांच्या तारखा पुरेशा वेळेआधी माहित असल्या तर त्यांना तयारीसाठी पूर्ण वेळ मिळेल,’ असं पाटील म्हणाले.

दहावी-बारावी परीक्षा सर्वसाधारणपणे फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेतल्या जातात. पण यावर्षी कोविड-१९ महामारी स्थितीमुळे त्या विलंबाने घेण्यात येणार आहेत. परीक्षा ४० ते ४५ दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत.दरम्यान, दहावीचे परीक्षा अर्ज भरण्याची मुदत २१ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा https://careernama.com