मुंबई – राज्यात आरोग्य विभागातील 5 सवर्गातील पदे तातडीने भरण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. या पदांची एकूण संख्या 10,127 इतकी असून ती तातडीने भरावयाची आहेत. कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर जिल्हा परिषद आंतर्गत ही भरती होणार आहे. यात तंत्रज्ञ, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका,आरोग्य पर्यवेक्षक या पाच सवर्गातील पदांची भरती केली जाणार आहे.
राज्यात सध्या कोरोना महामारीने थैमान घातले आहे. अशा काळात आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठी कामतरता जाणवत आहे. राज्याचे महसूल व ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी वित्त विभागाला पदे भरतीबाबत प्रस्ताव सादर केला आहे. त्यात आरोग्य विभागातील पाच संवर्गातील 10,127 पदे तातडीने भरण्याची मगणी केली आहे.
कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर शासनाकडून प्रभावी हाताळणी व नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने 10,127 रिक्त पदे भरण्याबाबतचा प्रस्ताव ग्रामविकास अधिकाऱ्यामार्फत वित्त मंत्र्यांच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. याला ग्रामविकास आणि वित्त मंत्री यांची परवानगी मिळाल्यानंतर या पदांची भरती तातडीने सुरू करण्यात येणार आहे.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com