10 th Board Results 2024 : प्रतिक्षा संपली… ‘या’ दिवशी जाहीर होणार 10 वीचा निकाल; शिक्षणमंत्री केसरकर यांची माहिती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । 12 वी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर (10 th Board Results 2024) झाला आहे आता विद्यार्थी आणि पालकांना प्रतीक्षा आहे ती 10 वी बोर्डाच्या निकालाची. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वी परीक्षेच्या निकालाच्या तारखेबद्दल सध्या अनेक चर्चा सुरु आहेत. बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीच्या परीक्षेचा निकाल दि. 4 जूनपर्यंत लागणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता मात्र शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या मुंबईतील पत्रकार परिषदेतील विधानामुळे आता विद्यार्थ्यांमध्ये नवीन चर्चेला उधाण आले आहे.

इयत्ता 10 वी परीक्षेचा निकाल येत्या दि. 27 मे रोजी लागणार असल्याची माहिती राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली. हा निकाल (10 th Board Results 2024) ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. मात्र, बोर्डाच्यावतीने याबद्दलची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च-एप्रिल 2024 मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय मिळविलेले गुण १० वी बोर्डाचा निकाल लागल्यानंतर मंडळाच्या वेबसाइटवर पाहता येणार आहेत.

यंदा बारावीच्या निकालाप्रमाणे दहावी बोर्डाच्या (10 th Board Results 2024) परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण वरील अधिकृत वेबसाईटवरून उपलब्ध होतील आणि सदर माहितीची प्रिंट विद्यार्थ्यांना घेता येईल. यासोबतच, Digilocker app मध्ये डिजिटल गुणपत्रिका (Digital Marksheet) उपलब्ध करून देण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या अधिकृत वेबसाईट्सवर पाहता येणार 10 वी चा निकाल –
1. mahresult.nic.in
2. http://sscresult.mkcl.org
3. www.mahahsscboard.in
4. https://www.digilocker.gov.in/
5. http://results.targetpublications.org

SMS द्वारे असा पहा निकाल – (10 th Board Results 2024)
1. सर्व प्रथम तुमच्या मोबाइलमध्ये SMS अॅपवर जा.
2. Create New Message वर क्लीक करा.
3. तिथे MHSSC (स्पेस) सीट क्रमांक (उदा. A 789124) हे डिटेल्स भरा.
4. हा मेसेज 57766 या क्रमांकावर पाठवा.
5. काही मिनिटांतच तुमच्या फोनवर निकालाचा तपशील येईल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com