10 th Board Results 2024 : धक्कादायक!! मराठीची दैनावस्था; बोर्डाच्या परीक्षेत इंग्रजीपेक्षा मराठीत नापास होण्याचं प्रमाण जास्त

10 th Board Results 2024
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । 10 वीचा टप्पा विद्यार्थ्यांच्या (10 th Board Results 2024) आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. नुकताच 10 वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता 10 वीचा यावर्षीचा संपूर्ण राज्याचा निकाल 95. 81 टक्के इतका लागला आहे. या निकालातून आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. मराठी भाषिक राज्यात इंग्रजी भाषेपेक्षा मराठीत नापास होणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या 6 पटीने जास्त आहे.

मराठी विषयात 38 हजार 437 विद्यार्थी नापास
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च 2024 मध्ये इयत्ता 10 वीची परीक्षा घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या भविष्यातील शैक्षणिक वाटचालीच्या दृष्टीने 10 वीचे वर्ष खूप महत्त्वाच मानलं जातं. त्यामुळे शाळा, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांकडून दहावीच्या परीक्षेसाठी कसून मेहनत (10 th Board Results 2024) घेतली जाते. यंदा राज्याचा निकाल 95. 81 टक्के इतका लागला. यावर्षी 14 लाख 84 हजार 441 विद्यार्थी पास झाले आहेत. एकंदरीत निकाल पाहता नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. पण दुर्दैवाने या परीक्षेत मराठी विषयात राज्यभरातून 38 हजार 437 विद्यार्थी नापास झालेत.

मुंबईत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण जास्त (10 th Board Results 2024)
संपूर्ण राज्यात मुंबईत मराठी विषयात नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वात जास्त म्हणजे 4 हजार 670 इतकी आहे. मुंबईत 1 लाख 6 हजार 256 विद्यार्थ्यांनी मराठीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात 1 लाख 5 हजार 322 विद्यार्थी परीक्षा केंद्रावर हजर राहीले त्यापैकी 1 लाख 652 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. इंग्रजी भाषेपेक्षा मराठीत नापास होणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या सहापटीने जास्त आहे.

मराठी भाषेचा निकाल 96.49%
इंग्रजी भाषेपेक्षा मराठीत नापास होणार्‍या विद्यार्थ्यांची (10 th Board Results 2024) संख्या सहापटीने जास्त आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेच्या परीक्षेसाठी 11 लाख 3 हजार 307 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मराठी विषयाची परीक्षा देणाऱ्या 10 लाख 94 हजार 152 विद्यार्थ्यांपैकी 10 लाख 55 हजार 715 विद्यार्थी पास झाले आहेत. मराठी भाषा विषयाचा निकाल 96.49 टक्के लागला.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com