करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व (10 th Board Results 2024) उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या 10 वी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. निकालाच्या मुल्यांकनाविषयी काही समस्या असतील तर विद्यार्थ्यांकडून गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन यासाठी दि. 28 मे ते दि. 11 जून या कालावधीत ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या कालावधीत करता येणार अर्ज (10 th Board Results 2024)
दहावीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांसंदर्भात विद्यार्थ्यांना काही आक्षेप असेल किंवा शंका वाटत असेल तर त्यांना 28 मेपासून 11 जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीने शुल्कासह अर्ज करणे आवश्यक आहे. मार्च 2024 च्या परीक्षेतील विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मागवण्यासाठी ई-मेलद्वारे/संकेतस्थळावरुन/हस्तपोहोच / रजिस्टर पोस्टाने यापैकी एका पर्यायाची निवड करता येईल व त्यांनी मागणी केलेल्या पध्द्तीने छायाप्रत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
मार्च २०२४ च्या परीक्षेतील उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत (Photocopy) घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून (10 th Board Results 2024) त्यापुढील पाच कार्यालयीन कामाच्या दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात प्रती विषय 300 रुपये प्रमाणे फी ऑनलाईन पध्दतीने भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com