10 th Board Exam 2024 : मनात धाकधूक!! उद्यापासून 10 वीची परीक्षा सुरु; 16 लाख विद्यार्थी बसले परीक्षेला

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । 10 वी बोर्डाची परीक्षा देणाऱ्या (10 th Board Exam 2024) विद्यार्थ्यांसाठी उद्याचा दिवस महत्वाचा ठरणार आहे. संपूर्ण राज्यात उद्यापासून 10 वीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. यावर्षी तब्बल 16 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. राज्यभरात सुमारे 5 हजार 86 केंद्रावर परीक्षेचं नियोजन करण्यात आलं आहे. परीक्षेदरम्यान होणारा गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांचीही नेमणूक करण्यात आली आहे. आज माध्यमिक शिक्षण मंडळाने यासंबंधी पत्रकार परिषद घेवून परीक्षेसंदर्भातील सर्व नियोजन पूर्ण झाल्याची माहिती दिली.

26 तारखेपर्यंत चालणार परीक्षा (10 th Board Exam 2024)
उद्या दहावीचा पहिला पेपर होत आहे. ही परीक्षा दि. 1 ते 26 मार्च दरम्यान होणार आहे. परीक्षेत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. दहावीनंतर (10 th Board Exam 2024) विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या व भावी जीवनाच्या दिशा स्पष्ट होतात त्यामुळे दहावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील एक महत्वपूर्ण टप्पा समजला जातो.

16 लाख विद्यार्थी देणार परीक्षा
यावर्षी १६ लाख विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. परीक्षेदरम्यान गैरप्रकार होण्याची शक्यता असते त्यामुळे राज्यभर भरारी पथके नेमण्यात आली आहेत. परीक्षेदरम्यान अनुचित प्रकार करणाऱ्यावर (10 th Board Exam 2024) कठोर कारवाई केली जाणार आहे. परीक्षा अत्यंत तणावमुक्त व पारदर्शक वातावरणात घेण्यासाठी परीक्षा मंडळाने सर्व उपाययोजना केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नये. परीक्षा काळात मोबाइलवर व्हायरल होणाऱ्या चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आलं आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com