मुंबई | विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी बालभारतीने महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयाच मिळून एकच पुस्तक आणण्याचा प्रस्ताव बालभारतीने मांडला आहे. बालभारतीचा हा प्रस्तवित निर्णय आहे. यावर शिक्षण मंत्रालय सकारात्मक भूमिका घेणार का याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
विद्यार्थी आणि पालकांमधून मात्र या प्रस्तावावित निर्णयाचं मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे. माजी मंत्री आशिष शेलार यांनी अशाप्रकारचा निर्णय घेताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा असे मत व्यक्त केले आहे. पहिली ते सातवीपर्यंतच्या पाठ्यपुस्तकांची निर्मिती बालभारतीकडून केली जाते. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी तसेच दप्तराच्या ओझ्यापासून विद्यार्थ्यांना मुक्त करण्यासाठी अशा प्रकारचा निर्णय घेतला जात आहे. सरकारने या प्रस्तावित निर्णयावर सकारात्मक विचार करावा अशी मागणी पालकांनी केली आहे.