CBSE च्या 12 वी परीक्षा रद्द; महाराष्ट्र सरकारही HSC च्या परीक्षा रद्द करणार? पहा शिक्षणमंत्री गायकवाड काय म्हणतायत

First to fourth school only two months! Anganwadi is closed this year
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सीबीएससी बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत मंगळवारी हा निर्णय घेण्यात आला. यानंतर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी महाराष्ट्र शासनही लवकरच १२ वी च्या परीक्षांबाबत आपला निर्णय जाहीर करेल अशी माहिती दिली आहे.

कोरोनाची सध्याची परिस्थिती, व आजारांच मुलांवर होणारा वाढता प्रार्दुभाव आणि परीक्षेचा संभ्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात वाढलेला तणाव विचारात घेता परीक्षा ऐवजी पर्यायी व्यवस्थेचा विचार करावा तसेच केंद्र सरकारने देश पातळीवर या संदर्भात एकसुत्र धोरण निश्चित करावे ही मागणी महाराष्ट्र शासनाने केली होती. या मागण्यांचा विचार करता केंद्रसरकारने CBSE ची बारावीची परीक्षा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा निश्चितच स्वागतार्ह आहे. मुलाच्या शैक्षणिक जीवनातील बारावी परीक्षा ही महत्त्वाची पायरी असली तरीही सध्याची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षा ही आपल्या सर्वांची प्राथमिकता असली पाहिजे. या पुढे महाराष्ट्र शासन ही महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षांबाबत ही विद्यार्थ्यांचे आरोग्य व हित जोपासून लवकरच निर्णय घेईल असे शिक्षणमंत्री गायकवाड यांनी म्हटले आहे.

 

दरम्यान, केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला बारावीच्या परीक्षांबाबत दोन दिवसात निर्णय घेऊ असे सांगितले होते. त्यानुसार आज सरकारने आपला निर्णय जाहीर करत विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. कोविड आणि भागधारकांकडून मिळालेल्या अभिप्रायामुळे तसेच सध्याची अनिश्चित परिस्थिती लक्षात घेता यावर्षी बारावीच्या बोर्ड परीक्षा होणार नाहीत असा निर्णय घेण्यात आला आहे. सीबीएसई वेळ-मर्यादित पद्धतीने परिभाषित उद्दीष्ट मापदंडानुसार इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांचे निकाल संकलित करण्यासाठी पावले उचलणार आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com