करिअरनामा । देशभरात बेरोजगारीची सावट अधिक गडद होत चालले आहे . देशभरात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या गगनाला भिडली आहे.आशा परिस्थितीत केंद्र सरकारच्या अंतर्गत येणारी लाखो पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे.यावरून केंद्र सरकारवर मोठ्या प्रमाणवर टीका होत आहे .
केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या विभागातील जवळपास सात लाख पदे रिक्त आहेत . या रिक्त असलेल्या पदांमध्ये तिसऱ्या श्रेणीत 5 लाख 75 हजार, दुसऱ्या श्रेणीत 90 तर पहिल्या श्रेणीतील 20 हजार पदे रिक्त आहेत. केंद्राने ही सगळी पदे टप्प्या टप्प्याने भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी मोठी भरती मोहीम राबवण्यात येणार आहे.
आज अनेक तरुण नोकरीसाठी शहराचा रस्ता धरतात .त्यामुळे शहरात बेरोजगारांची संख्या वाढू लागली आहे त्यामुळे नोकरी न मिळालेले तरुणांच्या आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारला रिक्त पदे भरणे आवश्यक आहे . तेव्हाच बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल .
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”