नवी दिल्ली । अनेक दिवसांपासून परीक्षेबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नव्हता. . अनेक राज्यांनी आणि विदयार्थी संघटनांनी पदवी परीक्षेसाठी विरोध केला आहे. पण विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC ) परीक्षेबाबत सुधारित मार्गदर्शन पत्रिका काढत पदवी परीक्षा या जुलै ऐवजी सप्टेंबर मध्ये घेण्यात येतील असा निर्णय घेतला आहे. असे जाहीर केले आहे.
कोरोना या जागतिक महामारीच्या संकटामुळे अनेक राज्यांनी पदवी परीक्षांसाठी विरोध दर्शवला होता. त्यामध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, ओडिसा , पश्चिम बंगाल, पंजाब तसेच दिल्लीचा पण समावेश होता. भविष्यातील अनेच संधीसाठी आणि त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेच मूल्यमापन करणे हे खूप गरजेचं आहे. तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे हे सर्व विद्यापीठांना बंधनकारक आहे. असेही मनुष्यबळ विकास मंत्रालयाने म्हंटले आहे.
जगातल्या सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये दूरस्थ पद्धतींचा अवलंब करत पदवी परिक्षेचा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक विद्यापीठांनी ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा स्वीकार करत परीक्षा घेण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यामध्ये प्रिन्स्टन, एमआयटी, केंब्रिज, इम्पिरियल कॉलेज ऑफ लंडन, टोरंटो, हॉंगकॉंग या विद्यापीठांचा समावेश आहे. असे मंत्रालयाने म्हंटले आहे.
सर्व राज्यातील विद्यापीठांनी एकत्र येत त्यावर तोडगा काढावा . कोणत्याही शैक्षणिक व्यवस्थेमध्ये विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे आणि शैक्षणिक गुणवत्ता हि जागतिक मूल्यांकनासाठी महत्त्वाची आहे. शैक्षणिक गोष्टींसाठी तडजोड न करता त्यांची विश्वसार्हता जपणे जास्त महत्वाचे आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करणे योग्य ठरणार नाही. विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या सूचनांचे पालन करत ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने सप्टेंबर मध्ये परीक्षा घेतल्या जाव्यात. या आठवड्यात आयोगांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल. असेही आयोगाने म्हंटले आहे.
नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com