करिअरनामा । रेल्वेत क्लार्क पदाच्या नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना फसवणाऱ्या टोळीला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.
विश्वजित शिवाजीराव माने (वय ५२, रा़ चव्हाणमळा, आष्टा, ता़ वाळवा, जि़ सांगली) व त्यांचे अन्य साथीदार यांना पोलिसांनी अटक केली आहे . काहीजण फरार असून मुख्य सुत्रधार अजित खंडागळे याला वाईहून ताब्यात घेण्यात आले आहे.
गेल्या दोन महिन्यांपूर्वी हंसराज जाधव यांच्या आत्याचा मुलगा लक्ष्मण याच्या मोबाईलवर फोन आला की, रेल्वेत नोकरी लावायची असेल तर माझी ओळख आहे़, मी काम करुन देते, असे ती महिला म्हणाली़, त्यानंतर २ जानेवारी रोजी जाधव व त्याचे नातेवाईक या महिलेला भेटायला स्वारगेटला गेले़. तेथे या महिलेने विश्वजीत माने याची ओळख करुन दिली. त्यावेळी माने याने दिल्ली येथे राहणारे अजित खंडागळे हे आपले मित्र असल्याचे व ते नोकरी लावून देतील, असे त्याने सांगितले़.
नोकरी लावण्याच्या आमिषाने त्याला पुणे रेल्वे स्टेशनवर बोलावून प्रथम ५० हजार रुपये घेतले़. त्यानंतर त्याला रेल्वेचा युनिफॉर्म शिवण्याकरीता कपडे देऊन १७ जानेवारीला कामावर हजर होण्याचे पत्र दिले़.परंतु, प्रत्यक्षात दिलेले हे पत्र बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी रेल्वे लोहमार्ग पोलिसांकडे फिर्याद दिली.
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”