‘आरटीई’ प्रवेश नोंदणीचा आजचा शेवटचा दिवस

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ।शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांसाठी शाळांनी नोंदणी करण्यासाठी आणखी दोन दिवसांची मुदतवाढ केली आहे, नोंदणीचा आजचा शेवटचा दिवस आहे.

आठ हजार ५४९ शाळांनी नोंदणी केली असून, त्यात एक लाख सहा हजार ६०१ विद्यार्थी क्षमता निर्माण झाली आहे, तर पुणे शहर व जिल्ह्यातील ८९६ शाळांची नोंदणी झाली असून, १५ हजार ६९१ विद्यार्थांचा प्रवेश होऊ शकतो.

शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, २१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत आरटीई प्रवेशासाठी शाळांना नोंदणी करण्याची मुदत होती. परंतु, शासनाकडून पैसे मिळत नसल्याने अनेक शाळांनी यात भाग न घेण्याचा निर्णय घेतला होता. नोंदणी कमी झाल्याने दोन दिवसांची मुदतवाढ देऊन ८ फेब्रुवारीला ही मुदत संपणार होती. तरीही सुमारे एक हजार शाळांनी ऑनलाइन नोंदणी केलेली नाही. म्हणून १० फेब्रुवारी अशी दोन  दिवसांची मुदतवाढ केली आहे.

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”