UPSC च्या तयारी दरम्यान आई-वडिलांचा अपघात! आर्थिक परिस्थितीचाही सामना केला; शेवटी अथक परिश्रमातून सफल

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा  ऑनलाईन । आजच्या तारखेला असे अनेक तरुण आहेत जे खूप अडथळ्यांना पार करून अधिकारी होतात. त्यातीलच एक म्हणजे शेखर कुमार! त्यांनीही अवघड परिस्थितीतून हे शक्य करून दाखवले. शेखर यूपीएससीच्या तयारीसाठी बिहारमधील एका गावातून निघाले होते. त्यांचा यूपीएससीचा प्रवास अत्यंत कठीण होता पण आव्हानांचा सामना करत त्यांनी कधीही हार मानली नाही. एकदा तयारीच्या वेळी त्यांच्या आई-वडिलांचा अपघात झाला, एकदा परीक्षा केंद्रात उशिरा आल्यामुळे त्यांचा यूपीएससीचा पेपर चुकला. शेवटी, तिसर्‍या प्रयत्नात त्यांना यश मिळाले.

मुलगा अधिकारी होण्याचे वडिलांचे स्वप्न होते:

शेखर कुमार यांचे वडील, मूळचे बिहारचे, त्यांना नेहमीच शेखर यांना नागरी सेवेत पाठवायचे होते. शेखर यांना यूपीएससीबद्दल फारसा रस नव्हता. हिंदी माध्यमातून शिकणार्‍या शेखरला यांना इंग्रजी सुधारण्यासाठी खूप कष्ट करावे लागले. तथापि, आपल्या कुटुंबाच्या स्वप्नासाठी शेखर यांनी यूपीएससीमध्ये येण्याचे ठरविले आणि कठोर परिश्रम करून तयारी सुरू केली. कोणत्याही परिस्थितीत ही परीक्षा उत्तीर्ण करुन दाखवायची हा त्यांचा निर्धार होता.

अनेक अडथळ्यांचा सामना केला:

यूपीएससीची तयारी करत असताना त्यांच्या पालकांचा त्यावेळी अपघात झाला. या अपघातात त्यांचे वडील कोमामध्ये गेले आणि आईच्या अर्ध्या शरीराचे काम थांबले. अशा परिस्थितीत त्यांनी आपली तयारी सोडून आपल्या पालकांची सेवा केली. जेव्हा परिस्थिती सामान्य झाली तेव्हा त्यांनी पुन्हा तयारी सुरू केली. पहिल्या प्रयत्नात शेखरला यांना यूपीएससीमध्ये अपयश आले. मेन्सची परीक्षा देण्यासाठी जेव्हा ते दुसऱ्यांदा परीक्षा केंद्रात आले तेव्हा प्रवेशाची वेळ संपली. अशा परिस्थितीत त्यांना परीक्षा देण्यास परवानगी दिली गेली नव्हती. तथापि, त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना पाठिंबा दर्शविला आणि तिसर्‍या प्रयत्नात त्यांनी यश संपादन केले.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com