THDC Bharti 2025 | आपल्या समाजात अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत. कारण त्यांच्यापर्यंत नोकरीच्या संधी वेळेवर पोहोचत नाही. आम्ही आमच्या लेखांमधून नेहमीच तुमच्यापर्यंत नोकरीच्या विविध संधी पोहोचवत असतो. त्याचा फायदा अगदी खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना देखील झालेला आहे. आज देखील आम्ही अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे टीएचडीसी इंडिया लिमिटेड ( THDC Bharti 2025) अंतर्गत एक भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत पदवीधर शिकाऊ, तंत्रज्ञ शिकाऊ आयटीआय ट्रेड शिकाऊ या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 100 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेल्या आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 15 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
पदाचे नाव | THDC Bharti 2025
या भरती अंतर्गत पदवीधर शिकाऊ, तंत्रज्ञ शिकाऊ आणि आयटीआय ट्रेड शिकाऊ या पदांच्या रिक्त जागा आहेत.
रिक्त पदसंख्या
या भरती अंतर्गत 100 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
वयोमर्यादा
या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.
अर्ज पद्धती
या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
15 जानेवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
पदसंख्या | THDC Bharti 2025
- पदवीधर शिकाऊ – 35 जागा
- तंत्रज्ञ शिकाऊ – 35 जागा
- आयटीआय ट्रेड शिकाऊ – 30 जागा
वेतन श्रेणी
- पदवीधर शिकाऊ – 9 हजार रुपये
- तंत्रज्ञ शिकाऊ – 8 हजार रुपये
- आयटीआय ट्रेड शिकाऊ – 7 हजार रुपये
अर्ज कसा करावा?
- या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
- 15 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.