करिअरनामा । ‘टीईटी’ उतीर्ण न झालेल्या २०१३ पासून विविध शाळांवर कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी दिले होते. यावेळी शिक्षकांनी यासंदर्भात तीव्र रोष व्यक्त करुन शिक्षण विभागाकडे ‘टीईटी’साठी मुदतवाढ देण्याची मागणी लावून धरली. त्यास बहुतांशी यश मिळाले असून ‘टीईटी’ला तात्पुरती स्थगिती मिळण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
शिक्षकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार होती. त्यामुळेच राज्यभरातून त्यास विरोध होत असून शिक्षक महासंघानेही ‘महाराष्ट्र राज्य टीईटी शिक्षक कृती समिती’ची स्थापना करून शिक्षण विभागाच्या या निर्णयास विरोध दर्शविणे सुरू केले .
शिक्षण विभागाकडे ‘टीईटी’ साठी मुदतवाढ देण्याची मागणी केली असता शिक्षकांसाठी जाचक ठरू पाहणाऱ्या ‘टीईटी’ला तात्पुरती स्थगिती मिळणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”