बेरोजगारांसाठी खूषखबर! TCS ची पात्रता परीक्षा सर्वांसाठी झाली खुली

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील पात्रता परीक्षा आता सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. त्यामुळे आता आपल्या कौशल्याच्या आधारावर नोकरी मिळविणे सोपे झाले आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. त्याचबरोबर चांगल्या कर्मचाऱ्यांच्या शोधात असणाऱ्या कार्पोरेट इंडस्ट्रीज ना चांगले कर्मचारीही मिळू शकणार आहेत. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या “आयओएन” विभागाची ही राष्ट्रीय पात्रता परीक्षा आहे. त्यामुळे यात सहभागी होणाऱ्या कार्पोरेटसना त्यांच्याकडील नवीन कर्मचारी भरतीसाठी सामाईक परीक्षा म्हणून ही परीक्षा पाहता येणार आहे. TCS National Qualifier Test

या परीक्षेसाठी दोन वर्षापर्यंतचा कामाचा अनुभव असलेले युवा कर्मचारी, सध्या शिक्षण घेत असणारेकोणत्याही शाखेतले विद्यार्थी तसेच पदवी, पदव्युत्तर विद्यार्थी पात्र असणार आहेत. माहिती तंत्रज्ञान(आयटी), बीएफएसआय, उत्पादन, फार्मा, एफएमसीजी क्षेत्रे यातील कंपन्या आणि टीसीएस या क्षेत्रात नोकरीची संधी उपलब्ध आहे. या सर्वांसाठी ही सामाईक परीक्षा असणार आहे. विशेष म्हणजे घरी बसून ही परीक्षा देता येणार आहे. आणि ज्यांच्याकडे आवश्यक पायाभूत सुविधा नसतील ते नजीकच्या “टीसीएस आयओएन सेंटर” मध्ये जावून परीक्षा देवू शकतात. TCS National Qualifier Test

दर तिमाही ला ही परीक्षा होणार असून यामध्ये तोंडी, संख्यात्मक आणि तर्क क्षमतांच्या आधारवर गुणांकन केले जाणार आहे. उमेदवारांच्या आकलन क्षमतांचे निदर्शक म्हणून हे गुणांकन कार्पोरेटस ना सादर केले जाणार आहेत. TCS National Qualifier Test आपले गुणांकन सुधारण्यासाठी उमेदवार अनेक वेळा परीक्षा देवू शकतात. प्रत्येक तिमाहीत होणाऱ्या परीक्षेतील गुणांकन हे पुढील दोन वर्षांसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. परीक्षा २४ त २६ ऑक्टोबर या कालावधीत होणार असून १७ ऑक्टोबर पर्यंत नोंदणी करायची आहे. https://learning.tcsionhub.in/hub/national-qualifire-test/ या संकेत स्थळावर नोंदणी करता येणार आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा Hello News.

अधिक माहितीसाठी पहा – (https://careernama.com)