पुणे प्रतिनिधी । विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात स्पर्धा परीक्षार्थी ह्यांच्या साठी लवकरच अभ्यासिका सुरू होणार असल्याचे पुणे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत सांगितले.
अभ्यासिका सुरू करण्याच्या निर्णयाबाबत महापौर यांनी पुढील भूमिका मांडली आहे, “पुणे शहरातील अभ्यासिका स्पर्धा परीक्षेच्या पार्श्वभूमीवर सुरु करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांना दिल्या असून त्यावर लवकरच निर्णय होईल. तसेच विविध निकषात ही परवानगी आपण देणार आहोत, याची विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि अभ्यासिका चालकांनी नोंद घ्यावी.”
अनेक दिवसांपासून स्पर्धा परीक्षार्थी अभ्यासिका सुरू करण्याबाबत विविध संघटनांतर्फे मागण्या करत होते. सध्या कोरोना विषाणू संसर्ग असल्यामुळे अभ्यासिका हा बंद होत्या. त्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा घेणार असल्याचे स्पष्ट केल्याने परीक्षार्थी अभ्यासासाठी आता पुण्यात येत आहेत.
पुणे शहरातील अभ्यासिका स्पर्धा परीक्षेच्या पार्श्वभूमीवर सुरु करण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या असून त्यावर लवकरच निर्णय होईल. विविध निकषात ही परवानगी आपण देणार आहोत, याची विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि अभ्यासिका चालकांनी नोंद घ्यावी !@ShoumikaMahadik @Mpsc_Andolan
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) August 14, 2020