करिअरनामा । शिक्षक भरतीसाठी पुन्हा टीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. शिक्षण खात्याने शिक्षक भरतीसाठी पुन्हा एकदा टीईटी घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा 15 मार्च रोजी संपूर्ण राज्यात पार पडणार आहे. शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असूनही टीईटी व सीईटीत गुणवत्ता मिळविणाऱ्या परीक्षार्थींची संख्या कमी असल्याने शिक्षक भरतीत अडचणी येत आहेत.
यावेळी टीईटीच्या निकालात वाढ होणे आवश्यक आहे. हा विचार करून शिक्षण खात्याने पुन्हा टीईटी घेण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण खात्याने शुक्रवारी टीईटीबाबत अधिसूचना जाहीर केली आहे. त्यानुसार शनिवारपासून टीईटीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरवात करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी परीक्षार्थी 25 फेब्रुवारी 2020 पर्यंत ऑनलाईन अर्ज करु शकतात.
त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. टीईटीत उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींना सीईटी द्यावी लागणार आहे. तसेच टीईटीत उत्तीर्ण झालेले डीएड व बीएडधारक सरकारी, अनुदानित व विनाअनुदानित शाळेत शिकविण्यास पात्र ठरणार आहेत.
अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.