सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या फेरपरीक्षेचे वेळापत्रक जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या ऑनलाइन फेरपरीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. 5 ते 7 नोव्हेंबर दरम्यान ही परीक्षा होणार आहे. तांत्रिक कारणांमुळे नियमित परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा 5 ते 7 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत होईल.

वेळापत्रकानुसार 5 नोव्हेंबरला शिक्षणशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी, वास्तुकला, मानसनीती आणि समाजशास्त्र, शारीरिक शिक्षण या अभ्यासक्रमांची, 6 नोव्हेंबरला वाणिज्य, व्यवस्थापन व विधी अभ्यासक्रम, तर 7 नोव्हेंबरला कला आणि विज्ञान अभ्यासक्रमांची परीक्षा होईल, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी दिली.

अंतिम वर्षातील नियमित, पुनर्रपरीक्षार्थी, बहि:स्थ अभ्यासक्रमातील द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा 12  ऑक्‍टोबरपासून घेण्यात आली. तांत्रिक आणि अन्य कारणांसाठी परीक्षेदरम्यान अडचणींचा सामना करावा लागलेल्या विद्यार्थ्यांकडून गुगल फॉर्म भरून घेण्यात आला होता. यात नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनाच ही फेरपरीक्षा देता येणार आहे, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

वेळापत्रक – click here

अधिकृत वेबसाईट – http://www.unipune.ac.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com