राज्य पोलीस दलात 12 हजार पदांची भरती ; गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आदेश

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । कोरोनाच्या काळात बेरोजगार तरुणांची संख्या वाढली. अशा परिस्थितीत बेरोजगार असलेल्या आणि लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावलेल्या तरुणांसाठी खूशखबर आहे. लवकरच पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याचे माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी  दिली.

राज्यातील पोलीस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी पोलीस शिपाई संवर्गात दहा हजार जणांची भरती करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे, त्यामुळे राज्यात पोलीस दलात दोन-चार हजार नव्हे तर 12 हजार 538 पदे भरण्यात येणार आहेत. डिसेंबरपर्यंत ही पदे भरण्यात यावीत, असे आदेशच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहविभागाला दिले आहेत.

गृहविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत मंत्रालयात एक महत्त्वाच्या बैठकीत कोणती कोणती पदे आणि कोणत्या कोणत्या विभागात रिक्त पदे आहेत, याचा आढावा घेऊन लवकर भरती प्रक्रियेला सुरवात करण्याचे ही आदेश देण्यात आले.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews .

अधिक माहितीसाठी – www.careernama.com