करिअरनामा । मंत्रालयात उपमुख्यमंत्री कार्यालयासाठी 64 पदे निर्माण करण्यात आली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, सहसचिव, ओएसडी, खासगी सचिव, जनसंपर्क अधिकारी आदी पदांना शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार ही पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी लागणारी पात्रता अजून घोषित करण्यात आली नाही. मात्र ही पदे लवकरात लवकर भरण्यात येणार आहेत.
मागील सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री हे पद नव्हते. आता महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे आता नव्याने उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयासाठी ही पदे विविध आस्थापनेवरील घेण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
_—-__
अधिक माहितीसाठी – www.careernama.com
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.