करिअरनामा । शिक्षणाधिकाऱ्यांचे बनावट आदेश काढून संस्थेत रिक्त जागा नसतानाही रिक्त जागा असल्याचे भासवून शिक्षक व शिपाई पदाची भरती केल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पाचोरा येथील गिरणाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंडित परशुराम शिंदे यांच्यासह सचिव व संचालक यांच्यासह इतर संचालकांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा परिषदेचे तत्कालिन शिक्षणाधिकारी देविदास पंडीत महाजन यांनी ही फिर्याद दिली आहे.
दरम्यान पाचोरा येथील गिरणाई शिक्षण संस्था संचलीत आदर्श माध्यमिक विद्यालय, पाचोरा या शाळेत ८ पदे मंजूर होती. ही आठ पदे कार्यरत असताना संस्थेने यांची शिपाई म्हणून नियुक्ती केली. या नियुक्त्या करताना संस्थाध्यक्ष, सचिव, संचालक व मुख्याध्यापकांनी शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांची बनावट सही करुन १७ नोव्हेंबर २०१७ च्या रोजीचे नियुक्ती आदेश काढले. नंतर हे प्रकरणे शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत नाशिकला न पाठविता शालार्थ आयडी म्हणून हे प्रकरण मंजूर करुन घेतले.
तसेच पदे रिक्त नसताना संचालक व मुख्याध्यापकांनी बनावट आदेश तयार करुन या नियुक्त्या करुन शासन व उमेदवारांची फसवणूक केली. शिक्षणाधिकारी कार्यालयातील बारनिशीमध्ये या नियुक्त्यांच्या नोंदी कुठेच आढळून आल्या नाहीत. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शिक्षणाधिकारी महाजन यांनी शहर पोलीस स्टेशन गाठून दोन्ही संस्थांचे पदाधिकारी, संचालक व मुख्याध्यापक यांच्याविरुध्द तक्रार दिली होती. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.