करिअरनामा । जन गण मन हे आपल्या देशाचे राष्ट्रगीत सर्वात आधी 1911 साली 27 डिसेंबर रोजी गायिले गेले. कोलकाता येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात राष्ट्रगीत पहिल्यांदा म्हंटले गेले. जन गण मन हे राष्ट्रगीत नोबेल विजेते साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले आहे.
बिशन नारायण धर हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. पहिल्या दिवसापासूनच राष्ट्रगीत वादात सापडले होते. वंदे मातरम या गीताला राष्ट्रगीत म्हणावे की जन गण मन असा वाद उदभवला होता. अखेर 1950 साली जन गण मन हेच देशाचे राष्ट्रगीत असेल यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
राष्ट्रगीतात भारतातील विविध भागांचा समावेश केला असल्याचे दिसून येते. भारत पाकिस्तानची फाळणी होण्याआधी राष्ट्रगीत लिहिले गेल्याने सिंध प्रांताचा उल्लेख राष्ट्रगीतामध्ये होता मात्र आता त्यात बदल करून सिंधच्या जागी सिंधू शब्दाचा उल्लेख केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रगीतासंबंधी दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी करताना म्हंटले की,राष्ट्रगीत राष्ट्रभक्ती व्यक्त करणारे स्तोत्र किंवा गाणे आहे, देशाचे प्रांत परिभाषित करणारे आख्यान नाही.
_—-__
अधिक माहितीसाठी – www.careernama.com
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.