मुंबई : राज्यातील वाढीव पदांना मान्यता मिळणेसाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी दिली.
रयत शिक्षण संस्थेच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या वाढीव पदांना मान्यता देण्याची विनंती सचीव रयत शिक्षण संस्था यांनी केली होती. त्यावेळी रयतसह सर्व राज्यातील वाढीव पदांचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरीसाठी ठेवला जाईल असे शिक्षण मंत्र्यांनी सांगितले.
मंत्री मंडळाच्या पदांना मंजुरी मिळाल्यानंतर या पद भरतीस मंजुरी देण्यात येईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. रिक्त शिक्षकांची पदे परवानगी देण्याची मागणी केली होती त्यावेळी शिक्षक पात्रता परीक्षा (टिईटी) व शिक्षक अभियोग्यता परीक्षा (टीएआयटी) उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या भरतीस मान्यता देण्यात येईल असे सांगण्यात आले.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 99219 59285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com