Hello Job । संपूर्ण देशाचा कारभार जेथून चालवला जातो अशा संसद भवनात काम करण्याची सुवर्ण संधी तरुणांसाठी चालून आली आहे. नुकतेच केंद्र सरकारने आपला राज्यसभा इंटर्नशीप प्रोग्राम सुरू केला आहे. देशभरातील इच्छुक तरुणांना राज्यसभेत इंटर्नशिप करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. राज्यसभा इंटर्नशीपसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2020 आहे. Rajya Sabha Internship
या इंटर्नशीपमध्ये तरुणांना देशाच्या संसदेचं कामकाज पाहता येणार आहे. राज्यसभेत ही इंटर्नशीप उन्हाळ्याच्या सुट्टीत होणार आहे. या इंटर्नशीपचा कालावधी दोन महिन्यांचा असणार आहे. तसेच उमेदवारांना प्रति महिना दहा हजार रुपये स्टायपेंड मिळणार आहे आणि इंटर्नशीप पूर्ण झाल्यावर भारत सरकारकडून सर्टिफिकेट देखील मिळणार आहे. Rajya Sabha Internship
शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट – कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी / पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत असणारे १८ ते ३० वर्षे वयोगटातील भारतीय नागरिक. Rajya Sabha Internship
इंटर्नशिपसाठी अर्ज कसा करावा?
अर्जदारांनी आपला अर्ज केवळ ऑफलाईन सादर करू शकतात. http://rajyasabha.nic.in/ या संकेतस्थळावर सांगितलेली सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जाला जोडणे अनिवार्य आहे.
निवड निकष काय आहे?
निवड पूर्णपणे गुणवत्तेच्या आधारे करण्यात येते. ज्या उमेदवारांचे
सामाजिक विज्ञान, कायदा, पत्रकारिता, वित्त, व्यवस्थापन, भाषा, पर्यावरण, विज्ञान इ. विषयांत उत्कृष्ट शैक्षणिक नोंद आहे अशांना प्राधान्य दिले जाते.
पगार / स्टायपेंड –
एक महिन्याच्या इंटर्नशिपसाठी स्टायपेंड म्हणून १०,००० रुपये दिले जातात
जाहिरात पहा – Click Here (www.careernama.com)
अर्ज करायचा पत्ता – एसडी नॉटियाल, जॉइंट सेक्रेटरी, राज्यसभा सेक्रेटरिएट, रुम नं. ५१७, पाचवा मजला, पार्लियामेंट हाऊस एनेक्स, नवी ११०००१ Rajya Sabha Internship
ईमेल – [email protected]
अर्जाची PDF डाऊनलोड करा – Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2020
अधिकृत वेबसाईट – https://rajyasabha.nic.in/
नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता ? घाबरू नका ? नोकरी विषयक अधिक माहितीसाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”
visit : www.careernama.com