Rकरिअरनामा ऑनलाईन | डिजिटल माध्यमांमुळे कमाईचे नवीन मार्ग खुले झाले आहेत. या डिजिटल प्लॅटफॉर्मवर कोण युट्युब, ब्लॉग यांसह इतर माध्यमातून कमी करत असतो. ज्याला डिजिटल माध्यमी हाताळण्याची सवय आहे तो पैसे कमवतोच मग त्या व्यक्तीचे वय कमी असले तरी. फोर्सब्सने नुकतीच ‘२०२० मध्ये सर्वाधिक कमाई करणारे युट्यूबर्स’ अशी यादीच जाहीर केली. त्यामध्ये ९ वर्षाचा एक चिमुकला असून तो जगातील सर्वाधिक कमाई करणारा सर्वात तरुण युट्यूबर ठरला आहे. त्याने २०२० या वर्षात तब्बल २१७ कोटी रुपये कमावले असून रायन काजी असे त्याचे नाव आहे.
फोर्सब्सच्या या यादीमध्ये सलग तिसऱ्यांदा रायन अव्वल स्थानी आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार रायनने त्याच्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून यंदाच्या वर्षी २९.५ मिलियन डॉलर म्हणजेच २१७ कोटी रुपये कमावले आहेत.रायन्स वर्ल्ड असं रायनच्या युट्यूब चॅनेलचे नाव आहे. या चॅनेलवर तो खेळणी आणि गेम्सचे रिव्ह्यू पोस्ट करत असतो. याशिवाय रायनने २०० मिलियन डॉलर्स म्हणझेच एक हजार १४७२ कोटी रुपयांची अतिरिक्त कमाई या चॅनेलच्या नावाने असणारी खेळणी आणि कपड्यांच्या व्यवसायातून केली आहे. रायनच्या नावाने आता एक टॉय आणि क्लोथिंग ब्रॅण्ड आहे.
मार्च २०१५ साली रायनचं पहिलं युट्यूब चॅनेल सुरु केलं. तेव्हापासून आतापर्यंत रायनच्या या चॅनेलचे दोन कोटी ७६ लाख फॉलोअर्स झाले आहेत. रायनला त्याचे आई-वडील व्हिडीओ बनवण्यासाठी मदत करतात. रायच्या अनेक व्हिडिओमध्ये त्याच्या दोन बहिणी दिसतात.
रायनचे कुटुंबीय एकूण आठ चॅनेल चालवतात. सर्व चॅनेलच्या सब्रस्कायबर्सची एकूण संख्या चार कोटी १७ लाख इतकी आहे. एकूण व्ह्यूज १२२० कोटी इतके आहेत. रायनबरोबरच त्याचे आई-वडीलही मोठ्या हौसेने या व्हिडीओंसाठी काम करतात. रायन हा मागील अनेक वर्षांपासून सर्वादिक कमाई करणारा सर्वात तरुण युट्यूबर आहे. टॉय रिव्ह्यूजच्या माध्यमातून विश्वास निर्माण करणारा रायन लवकरच त्याच्या एका टीव्ही शोमध्ये दिसणार आहे. निकालोडियन्स या मुलांसाठीच्या वाहिनीने टीव्ही शोसंदर्भात रायनसोबत करार केला असून यामधूनही त्याने घसघशीत कमाई केलीय. रायन हा सध्या जाहिरात विश्वामध्ये चाइल्ड इन्फ्यूयन्सर म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच कोलगेट, रोकू. वॉलमार्टसारख्या बड्या ब्रॅण्डने रायनसोबत करार केले आहेत. त्याचप्रमाणे हूलू या नेटवर्कींग ब्रॅण्डनेही रायनला करारबद्ध केलं आहे.
जिमी डोनाल्डसन दुसऱ्या क्रमांकावर
फोर्ब्सच्या यादीनुसार सर्वाधिक कमाई करणाऱ्या युट्यूबर्सच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर जिमी डोनाल्डसनचा क्रमांक लागतो. मिस्टर बिस्ट असं जिमीच्या चॅनेलचे नाव आहे. मिस्टर बिस्टने या वर्षी २४ मिलियन डॉलर म्हणजेच १७६ कोटी ६० लाख रुपये कमावले आहे.
जिमीने २०१६ मध्ये कॉलेजमधून ड्रॉप आऊट म्हणून बाहेर पडल्यानंतर आपलं युट्यूब चॅनेल सुरु केलं. जिमीने बिझनेस इनसायडरला दिलेल्या मुलाखतीत जानेवारी २०१७ मध्ये एका व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. यामध्ये एक लाख पर्यंत आकडे मोजले होते. यासाठी मला ४४ तास लागल्याचे म्हटलं होतं.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com