करिअरनामा । राज्यात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आगामी काळात प्रयत्न केले जातील. पोलिस भरती का रेंगाळली याबाबत माहिती घेऊन ही प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाईल. अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी देशमुख बारामतीत आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. देशमुख म्हणाले, ‘‘पवार यांनी माझ्यावर राज्याच्या गृहमंत्रिपदाची आव्हानात्मक जबाबदारी सोपविली आहे. ती मी योग्यरीतीने पार पाडील. नागपूरचा उल्लेख क्राईम कॅपिटल म्हणून होत आहे.
वास्तविक, तो माजी मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ आहे. गृह विभागासह अनेक जबाबदाऱ्या त्यांच्याकडे होत्या.
त्यामुळे त्यांना या विभागाकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नसेल. मात्र, आता नागपूरसह राज्यातील सर्व शहरांमध्ये कायदा व सुव्यवस्थेसाठी लक्ष दिले जाईल.’’ गृहमंत्रालय माझ्यासाठी नवीन आहे. राज्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांशी बुधवारी (ता. ८) चर्चा करण्यात येईल. त्यानंतर कोणत्या विषयांना प्राधान्य द्यायचे, हे ठरवून पुढील दिशा निश्चित केली जाणार असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.
_—-__
अधिक माहितीसाठी – www.careernama.com
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.