करिअरनामा । २०२० मध्ये होणाऱ्या पोलीस भरती प्रकियेत पारदर्शकता असणं महत्वाचं आहे. तसेच शारीरिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या उमेदवारांची पोलीस पदावर नियुक्ती झाली पाहिजे. त्यामुळे राज्य शासनाने भरती करताना प्रथम मैदानी चाचणी घेऊन पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घ्यावी, अशा मागणीचे निवेदन खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
‘राज्यातील पोलिस भरतीची परीक्षा पूर्वीच्या नियमांप्रमाणे घेण्यासोबतच, या परीक्षेबाबत गेल्या सरकारने काढलेला शासन निर्णय रद्द करावा,’ अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. राज्य सरकारने पोलिस भरतीच्या परीक्षेमध्ये जानेवारी २०१९ मध्ये शासन निर्णयाद्वारे बदल केले. या भरतीमध्ये ऑनलाइन परीक्षेला महत्त्व देण्यात आले असून, मैदानी चाचणीला दुय्यम स्थान दिल्याचा आरोप स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांकडून करण्यात येत आहे.
या भरती परीक्षेतील बदलांमुळे ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील उमेदवारांवर अन्याय होत असल्याची तक्रार उमेदवारांकडून होत आहे. त्यामुळे राज्यात पोलिस भरतीची परीक्षा पूर्वीप्रमाणे घेण्याची मागणी सातत्याने उमदेवारांकडून करण्यात येत आहे. या अनुषंगाने खासदार सुळे य़ांनी पोलिस भरती परीक्षा पूर्वीच्या निकषाप्रमाणे घेण्याची मागणी केली आहे.
मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या प्रमुख मागण्या –
१) मैदानी चाचणी झाल्यानंतर ऑफलाइन पद्धतीने लेखी परीक्षा घ्यावी. २) मैदानी चाचणीही लेखी परीक्षेप्रमाणे १०० गुणांसाठी व्हावी.
_—-__
अधिक माहितीसाठी – www.careernama.com
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.