NEET परीक्षेचा निकाल 16 ऑक्टोबरला; असा चेक करा रिझल्ट

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

मुंबई । राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) यूजी 2020 चा निकाल 16 ऑक्टोबरला घोषित करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राष्ट्रीय चाचणी एजन्सीला दिले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी NEET UG-2020 परीक्षा दिली होती ते एनटीएच्या ऑफिशियल वेबसाईट nta.ac.in आणि ntaneet.nic.in वर निकाल चेक करु शकतात. निकालासोबतच एनटीए आज नीट- 2020 परीक्षेची फायनल अंन्सर की देखील जाहीर करेल, असं बोललं जात आहे. तर कोविड -19 किंवा कंटेन्मेंट झोनमध्ये अडकल्यामुळे परीक्षेला हजर होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना 14 ऑक्टोबरला परीक्षेला हजर राहण्याची संधी द्या, असं देखील कोर्टाने म्हटलं आहे.

NEET Result 2020: असा चेक करा रिझल्ट

– सर्वात आधी अधिकृत वेबसाईट ntaneet.nic.in वर या
– यानंतर रिझल्ट असं लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा
– त्यानंतर अॅप्लिकेशन नंबर, जन्मतारिख आणि सेक्युरिटी पिन टाकून सबमिट करा
– नंतर नीट 2020 रिझल्ट आपल्या स्क्रिनवर दिसेल.
– आपला रिझल्ट डाऊनलोड करा किंवा प्रिंट काढून घ्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”