करिअरनामा । शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाच्यावतीने मोफत पाठ्यपुस्तके आणि गणवेश दिली जातात.त्याचप्रमाणे या ही वर्षी विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत पाठ्यपुस्तके देण्याच्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा केला जातो त्यामुळे जानेवारीच्या अखेरपर्यंत ई-बालभारती पोर्टलवर पुस्तकांची नोंदणी करण्याचे आवाहन महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या प्रकल्प संचालक डॉ. अश्विनी जोशी यांनी केले आहे.
शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना वेळेत पुस्तके मिळत नसल्याने पुस्तकांची कमतरता निर्माण होते.विद्यार्थी संख्या आणि पुस्तकांची संख्या यामध्ये खूप तफावत आढळून येत असल्याचे निदर्शनास आल्याने ज्यांना कमी पुस्तके मिळतील त्यांना ती पुन्हा देण्यात येतील त्यामुळे प्रत्येक शाळांनी शिल्लक असलेली पुस्तक संख्या वजा करायची आहे. ती संख्या वजा करूनच विद्यार्थ्यांच्या पुस्तकांची मागणी जानेवारी अखेरपर्यंत इ-बालभारती पोर्टलवर प्रत्येक शाळांनी आपली माहिती भरायची आहे.
नव्या शैक्षणिक वर्षाच्या शाळा जून महिन्यात सुरू होतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके मिळणे आवश्यक आहे .त्यामुळे ती पुस्तके देण्याचे नियोजन जानेवारी महिन्यापासून सुरू केले आहे.
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.