करिअरनामा ऑनलाईन । मुंबईत कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढू लागला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून बृह्नमुंबई महापालिकेनं आपल्या हद्दीतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी यासंदर्भातील आदेश काढला आहे. त्यामुळे आता मुंबईतील शाळा नव्या वर्षातच उघडणार आहे.
राज्यात २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. तर दुसरीकडे मुंबईसह राज्यातील कोरोनाचं सावट अजूनही कमी झालेलं नाही. जनजीवन पूर्वपदावर येत असून, रस्त्यांवर गर्दीही वाढताना दिसत आहे. त्यामुळे कोरोना प्रसाराचा धोका वाढला असून, दिवसागणिक रुग्णसंख्याही वाढताना दिसत आहे. मुंबईतही कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बृह्नमुंबई महापालिकेनं आपल्या हद्दीतील शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी यासंदर्भातील आदेश काढला आहे. त्यामुळे महापालिका हद्दीतील शाळा पुढच्या वर्षीच सुरू होणार आहे.
मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व खासगी, सरकारी, महापालिकेच्या शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या सोमवारपासून म्हणजेच २३ नोव्हेंबरपासून राज्यातील इतर भागांमधील नववी ते बारावीचे वर्ग सुरु होणार असले, तरी मुंबईतील शाळा बंदच राहणार आहेत. शाळांबाबत राज्य सरकारने दिवाळीपूर्वीच वेगळा आदेश काढला होता. मुंबई महापालिका आयुक्तांनी आपल्या अधिकारांचा वापर करत येत्या ३१ डिसेंबरपर्यंत शहरातील कोणत्याही शाळा सुरु होणार नाही, असे आदेश दिले आहेत. “मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईतील शाळा २३ नोव्हेंबरला सुरू होणार नाही,” असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com