[दिनविशेष] 16 नोव्हेंबर। राष्ट्रीय पत्रकारिता दिवस

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । आपल्या देशात 16 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा केला जातो.  16 नोव्हेंबर 1966 मध्ये स्थापन झालेल्या प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या (PCI) स्थापनेच्या दिनानिमित्त दरवर्षी  आजरोजी साजरा केला जातो.

प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचा स्थापना दिन म्हणजेच राष्ट्रीय पत्रकारिता दिन हा एक स्वतंत्र आणि जबाबदार पत्रकारिता यांचे प्रतीक म्हणून बघितला जातो. प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही माध्यमांसाठी एक नैतिक देखरेख म्हणून काम बघणारी संस्था आहे.

भारत हा एक स्वतंत्र देश आहे. तसेच देशाच्या  संविधानामध्ये भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य समाविष्ट केलेला देश आहे. त्यामुळे आपल्या देशात माध्यमांचे मूल्य हे जपले जाते. रिपोर्टर विथ बॉर्डर्सच्या प्रेस स्वातंत्र्य निर्देशांकात भारताचे स्थान 2020 मध्ये 142 व्या स्थानावर होते.

जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिन 03 मे रोजी जगभर साजरा केला जातो. जागतिक दिनाची 2020 ची थीम पुढीलप्रमाणे – “भीती किंवा प्रलोभनाशिवाय पत्रकारिता” अशी आहे.

——————————————————-
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com व Facebook page  करीअरनामाला भेट द्या.  करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
[email protected]
——————————————————