करिअरनामा । विद्यापीठाचे नामांतरण ही महाराष्ट्रासाठी किंबहुना भारतासाठी नवीन गोष्ट नाही. नवीन विद्यापीठाच्या घोषणेनंतर विद्यापीठाला त्या शहराचे किंवा भौगोलिक नाव देण्यात येते. तसेच ठराविक समाजाची मागणी किंवा आंदोलनाची दखल घेऊन नामांतर केले जाते. मात्र पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले विद्यापीठ हे नाव का देण्यात आले ते आज आपण जाणून घेवू.
२००४ साली नामांतर समिती आणि विविध पक्षांनी विद्यापीठाचे आधीचे नाव बदलून सावित्रीबाई फुले विद्यापीठ करावे अशी मागणी केली. यासाठी नामांतर समितीने वेळोवेळी आंदोलने केली. विद्यापीठात झालेल्या अधिसभेत सिनेटने नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. हा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य सरकारकडे पाठवण्यात आला. पुणे विद्यापीठाच्या नावाशी, स्त्रीशिक्षणासाठी आपले आयुष्य वेचलेल्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले यांचे नाव जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. ७ जून २०१४ मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालं.
त्यानंतर पुणे विद्यापीठाच्या अधिसभेत जानेवारी महिन्यात पुणे विद्यापीठाचा ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’, असा नामविस्तार करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला होता. सरकारने नामविस्ताराचा ठराव मंजूर केला होता, तसा अध्यादेश काढला आणि त्यानंतर लगेच नामविस्ताराचा समारंभ आयोजित करून नामविस्तार करण्यात आला.
_—-__
अधिक माहितीसाठी – www.careernama.com
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.