करीअरनामा । जिल्हा परिषद नागपूर येथे विविध पदांच्या १६८ जागांसाठी भरती. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.
पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे–
ग्रामसेवक : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य किंवा शासनमान्य संस्थेतुन अभियांत्रिकी डिप्लोमा (तीन वर्षाचा अभ्यासक्रम) ०२) शासनमान्य संस्थेतुन समाजकल्याण मधील पदवी (बी.एस.डब्ल्यू.) किंवा कृषी विषयातील पदवी ०३) संगणकाचे ज्ञान आवश्यक.
औषध निर्माण अधिकारी : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा डिप्लोमा आणि औषध शास्त्र अधिनियम १९४८ खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक.
आरोग्य सेवक : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रस्ताविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक: ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असतील ०२) स्थापत्य सहाय्यकाचा ०१ वर्षाचा पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण .
शिक्षण सेवक : १६० जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त मंडळाचे किमान ५०% गुणांसह उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष. डिप्लोमा किंवा बी.एड./बी.ई.आय.एड./डी.टी.एड.
पशुधन पर्यवेक्षक: ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पशुवैद्यक शाखातील पदवी
वयाची अट : ३१ डिसेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ते ४३ वर्षे
एकूण जागा – १६८ जागा
अर्ज फीस – २५०/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०६ जानेवारी २०१९
अधिकृत वेबसाइट – www.nagpurzp.com
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com/ व Facebook page करीअरनामाला भेट द्या.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
✉ [email protected]