नागपूर महानगरपालिकेत ४ हजारांवर पदे रिक्त

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । नागपूर महानगरपालिकेत ११,९६१ पदे मंजूर पदांपैकी तब्बल ४००४ पदे रिक्त आहेत. अस्थापना खर्चही ५० टक्यांवर आहे. त्यामुळे आता मनपावरील ताण वाढला आहे. मनपात कंत्राटी कर्मचारीही कार्यरत आहेत. शिक्षक संवर्गातील १०७ पदे मात्र अतिरिक्त ठरली आहेत. त्यामुळे सातवा वेतन आयोग रखडला आहे.

आतापर्यंत ८६९ कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे. ८५० आश्वासीत पदोन्नती झाल्या आहेत. २००४ मध्ये रिक्तपदे भरण्यात आली. त्यानंर २०१२मध्ये पदभरती झाली. तदनंतर भरती रखडली आहे. त्यामुळे रिक्त पदांची संख्या मोठी आहे. सेवानिवृत्त होणाऱ्यांची संख्या दर महिन्यात वाढत आहे.

त्यामुळे कंत्राटी नियुक्तीवर काम सुरू आहे. अतितात्काळ स्वरुपाची ५४ पदे भरण्यात आली आहेत. कंत्राटी सेवानिवृत्तीनंतर पदभरती केलेल्यांची संख्या तीनशेच्या आसपास असेल. सीमेंट रस्त्यांसाठी ८० तर, अग्निशमन विभागात १३ जणांची भरती करण्यात आली. उपद्रव शोध पथकातही कंत्राटी भरण्यात आली आहे. त्यामुळे कामावर परिणाम होत आहे.