करिअरनामा ऑनलाईन । मुंबई महापालिका वर्षे २०२१- २२ चा अर्थसंकल्प ३ फेब्रवारीला महापालिकेत सादर केला गेला. यावेळी महापालिकेचे सहआयुक्त रमेश पवार यांनी शिक्षण समितीच्या अध्यक्षा श्रीमती संध्या दोशी यांच्याकडे शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी शिक्षण विभागासाठी केलेल्या या अर्थसंकल्पात मुंबईतील महापालिकेच्या शाळांचे नाव बदलण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला.
या दरम्यान, महापालिकेच्या शाळांचे नाव बदलून ‘मुंबई पब्लिक स्कुल’ असे करण्याची घोषणा करण्यात आली. महापालिकेच्या सर्व शाळांबद्दल मुंबईतील जनतेच्या मनात सकारात्मक आणि एक चांगला दृष्टीकोन निर्माण व्हावा यासाठी हा नामांतराचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच शिक्षण विभागासाठी ह्या अर्थसंकल्पात २९, ४५, ७८ कोटींची तरतूद करण्यात आली असून मागील वर्षीच्या तुलनेत अर्थसंकल्पात यंदा १. १९ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. प्राथमिक विभागाच्या ९६३ आणि माध्यमिक विभागाच्या २२४ महापालिका शाळांच्या मूळ नावासह मुंबई पब्लिक स्कुल MPS असं नामांतर करून, त्यासाठी MPS साठी नवा लोगोही तयार केला आहे.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com