करिअरनामा । राज्य सेवा पूर्व परीक्षांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सोमवारी घोषणा केली. यामध्ये गट अ व ब मधील १५ पदांच्या एकूण २०० जागांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये सर्वाधिक ७३ जागा नायब तहसीलदाराच्या आहेत. गेल्यावर्षी ३४२ जागांसाठी प्रक्रिया झाली. यंदा पदांची संख्या १४२ ने कमी झाली. परीक्षांची तयारी करणाऱ्यांची संख्या वाढली आणि पदभरतीचा आकडा कमी झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जाहिरातीनुसार, सहायक राज्यकर आयुक्त १० पदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी सात, सहायक आयुक्त, प्रकल्प अधिकारी एक, उद्योग उपसंचालक, तांत्रिक एक, सहायक संचालक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता दोन, अशी वर्ग एकमधील २१ पदांची भरती केली जाईल. वर्ग ब मधील उपशिक्षणाधिकारी, शिक्षण सेवा २५, कक्ष अधिकारी २५, सहायक गट विकास अधिकारी १२, सहायक निबंधक सहकारी संस्था १९, उपअधीक्षक भूमी अभिलेख सहा, उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग एक, सहायक प्रकल्प अधिकारी, संशोधन अधिकारी तत्सम ११ आणि नायब तहसीलदार ७३ पदांची भरती केली जाणार आहे.
या पदांसाठीची पूर्व परीक्षा ५ एप्रिल रोजी राज्यातील ३७ केंद्रावर घेण्यात येईल. यासाठी २३ डिसेंबर ते १३ जानेवारी या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील. पूर्व परीक्षेद्वारे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षा दोन, तीन व चार ऑगस्ट २०२० रोजी होईल, अशी शक्यता आहे. यासंदर्भातील सविस्तर माहिती https://mahampsc.mahaonline.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
_—-__
अधिक माहितीसाठी – www.careernama.com
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.