कोरोनाचा MSCIT, टेली क्लासना फटका, MKCL विद्यार्थ्यांसाठी आणणार इरा सॉफ्टवेअर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । कोरोना विषाणूने सध्या जगभरात थैमान घातले आहे. राज्यातील लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी जाहीर केले आहे. कोरोनामुळे शाळा, महाविद्यालयेसुद्धा बंद आहेत. आता कोरोनाचा फटका टेली क्लासनाही बसला असल्याचे दिसत आहे. दहावी आणि बारावीची परीक्षा झाली की विद्यार्थांना ‘एमएससीआयटीचे’ क्लास लावण्याची गडबड चालू असते. मात्र कोरोनामुळे सर्वच बंद विद्यार्थ्यांना या कोर्सेसपासूनही वंचित राहण्याची वेळ आली आहे.

 ‘एमएससीआयटीचे’ प्रशिक्षण सर्वच क्षेत्रात महत्वाचे असल्याने  मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांत दहावी-बारावीच्या परीक्षा संपल्या की बरेचसे विद्यार्थी कम्प्युटरचे प्राथमिक ज्ञान पदरात पाडून घेण्याच्या हेतूने ‘एमएससीआयटीचे’ प्रशिक्षण घेतात. सरकारी नोकरीतील तृतीय श्रेणीतील कनिष्ठ लिपिकपदासाठी मराठी, इंग्रजी टंकलेखन, लघुलेखन अनिर्वाय असल्याने अनेक विद्यार्थी एमएससीआयटी बरोबर ‘टॅली’ प्रणालीही शिकून घेतात. हे क्षेत्र शिकविणाऱ्या संस्थांसाठीही मार्च ते मे महिने व्यवसायाच्या दृष्टीने तेजीचे असतात. मात्र सध्या या सर्व आघाड्यांवर अक्षरश: शुकशुकाट आहे.

 ‘करोना’च्या पार्श्वभूमीवर या केंद्रांचे कामकाजही बंद झाले आहे. ‘एमएससीआयटी’ची परीक्षा घेणारी ‘एमकेसीएल’ ही संस्था येत्या एक-दोन दिवसांत ‘इरा’ नावाचे एक वैशिष्ट्यपूर्ण अ‍ॅप्लिकेशन विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आणत आहे. त्या अ‍ॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कम्प्युटरचा काही प्रमाणात अभ्यास करता येईल. या प्रशिक्षणात विंडोज-१०, एमएस-ऑफिस, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट आदी कम्प्युटर प्रणाली कशा वापरायच्या, हे शिकवले जाते. ‘एमएससीआयटी’सोबत टॅली, वेब डिझायनिंग, ग्राफिक्स डिझायनिंगचे प्रशिक्षण पूरक शिक्षण म्हणून विद्यार्थी घेतात.

नोकरी आणि करिअर विषयक अपडेट थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 नंबरवर Whatsapp करा आणि लिहा “HelloNews”